मुंबई : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने देशाची स्थिती आणखीनच गंभीर होत चालली आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधीही वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लॉकडाऊनदरम्यान सगळेच सेलिब्रेटी सोशल मिडियावर फारच सक्रिय आहेत. ज्यामध्ये ते लॉकडाऊन दरम्यान घरी काय करत आहेत याचे व्हिडिओ आणि फोटोज सोशल मिडियावर शेअर करत असतात. या लॉकडाऊनमध्ये कलाकारांना आपण सर्वांनीच भांडी घासताना, साफसफाई करताना, जेवण बनवताना आदी अनेक गोष्टी करताना बघितले आहे. अशातच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता चिरंजीवी देखील या लॉकडाऊनदरम्यान सोशल मीडियावर फारच सक्रिय असताना दिसून आले. ते देखील या लॉकडाऊनमध्ये नवनवीन गोष्टी बनवण्याच्या प्रयत्नात आहे. आता लॉकडाऊनमध्ये ते चक्क शेफ बनले आहेत. ते आपल्या आईसाठी जेवण करत आहेत. त्यांनी त्यांच्या आईसाठी एक खास पदार्थ बनवला आहे. तो म्हणजे डोसा.
यासंदर्भातील एक व्हिडीओ त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. चिरंजीवी यांना जेवण बनवता येत हे त्यांनी आजवर अनेक मुलाखतीत सांगितले आहे. पण आता व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर करता त्यांनी त्याचा पुरावा देखील दिला आहे. या व्हिडिओमध्ये ते अगदी अनुभवी शेफ सारखे स्वयंपाक घरात डोसा बनवताना दिसून येत आहेत. डोसा बनवून झाल्यानंतर त्यांनी तो डोसा त्यांच्या आईला दिला आहे. त्यांच्या आईने याचा पहिला घास चिरंजीवी यांना भरवला आहे. अशाप्रकारे ते आपल्या आईसोबत मौल्यवान वेळ घालवताना दिसून आले आणि त्याचं त्यांच्या आईवरील प्रेम दिसून आलं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होताना दिसत आहे. काही वेळातच या व्हिडिओला बरेच व्ह्यूज आले असून चाहते हा व्हिडिओ पाहून भाऊक झाले आहेत.
सध्या या लॉकडाऊनमध्ये चिरंजीवी आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आहेत. ते नेहमीच चित्रपटात आपल्या ॲक्शन सीन्समधून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. आज त्यांनी या व्हिडीओमधून वेगळ्या पद्धतीने चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.